आम्ही ‘मुख्यमंत्र्यांनाच’ उत्तरदायी आहोत – जितेंद्र आव्हाड

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आपआपल्या पक्षांच्या नेत्यांना उत्तरदायी असतात, असा आरोप विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आव्हाड एका मुलाखतीत बोलत होते.

आम्ही मुख्यमंत्र्यांनाच उत्तरदायी आहोत. आमचे नेते शरद पवार हे संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे आम्ही त्यांना बोललो की ते आम्हाला सांगतात आधी मुख्यमंत्र्यांना सांगतात.आमचं सरकार भाजपसारखं नाही. सगळे अधिकार एकाच माणसाकडे हे फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. हे उद्धव ठाकरे करू शकत नाही, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मुंब्रा कळवा सारख्या भागात लॉकडाउन पाळला गेला पाहिजे, याबद्दल जितेंद्र आव्हाड बोलत नाही, फडणवीसांच्या या आरोपवारही आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं.

फडणवीसांना ज्या मोहल्ल्यांचा उल्लेख करायचा होता. त्या मोहल्ल्यांमध्ये आतापर्यंत दोनच रुग्ण सापडले आहेत. दुर्दैवानं मला माहिती नाही, देवेंद्रजींना कोणत्या व्याधीनं पछाडलंय, असं आव्हाड म्हणाले. तर दुसरीकडे फडणवीसांनी काल राज्यपालांची भेट घेतली, त्यावेळी जितेंद्र आव्हाडांना बडतर्फ करण्यात याव अशी  मागणी त्यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी सरकार धाडसी निर्णयाच्या तयारीत; आर्थिक आणीबाणी लागू होणार?

-“तबलिगींच्या कार्यक्रमाला केंद्रिय गृहमंत्रालयाने कशी काय परवानगी दिली”

-पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी

-“राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1135, महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही”

-‘माझ्यावर प्रेम असेल तर एवढचं करा…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच आवाहन