जितेंद्र आव्हाडांची हकालपट्टी करा; भाजपची राज्यपालांकडे मागणी

मुंबई | ‘सोशल मीडियावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट केल्याबद्दल एका व्यक्तीला मंत्री आव्हाड यांच्या समक्ष त्याच्या सुरक्षरक्षकाना मारहाण केल्याने कायदा हातात घेणाऱ्या आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते त्यावर आव्हाड यांनी टीका केली होती. त्यावर सोशल मीडियावर अनंत करमुसे या तरूणाने आव्हाडांविरोधात मजकुर टाकल्याने आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षकांनी सरकारी बंगल्यावर आणून आव्हाड यांच्या समक्ष मारहाण केल्याचा आरोप संबंधित तरूणाने केला.

जर मंत्रीच हातात कायदा घेत असतील तर जनतेने काय करायचं?, या मारहणीबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावं आणि त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज विरोधी पक्षनेते कोटक, योगेश सागर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-

-आम्ही ‘मुख्यमंत्र्यांनाच’ उत्तरदायी आहोत – जितेंद्र आव्हाड

-मोदी सरकार धाडसी निर्णयाच्या तयारीत; आर्थिक आणीबाणी लागू होणार?

-“तबलिगींच्या कार्यक्रमाला केंद्रिय गृहमंत्रालयाने कशी काय परवानगी दिली”

-पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी

-“राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1135, महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही”