“प्रत्येकानं आपापल्या लायकीप्रमाणं राहायचं, हे मोदींनी लक्षात घ्यावं”

मुंबई |  ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं भाजपकडून दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली असल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रत्येकानं आपापल्या लायकीप्रमाणं राहायचं, हे मोदींनी लक्षात घ्यावं असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

जगाच्या अंतापर्येंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज  होणे नाही, असं म्हणत आव्हाडांनी “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” हे पटत नाही मनाला, असं ट्विट केलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारं हे पुस्तक दिल्ली भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रकाशित झालं आहे. शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणं अनेकांना पटलेलं नाही. त्यामुळे पुस्तक वादात अडकण्याची शक्यता आहे.

मराठा क्रांती मोर्चानेही या पुस्तकाला विरोध दर्शवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आपण प्रधानमंत्री आहात आपला सन्मान आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना कधीही शक्य नाही, या घटनेचा निषेध करतो, असं समन्वयक विनोद पाटील म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-