‘मौका सभी को मिलता है…’; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा

मुंबई | नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असल्यानं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विभागवार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे.

ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार योग्य रित्या आपला कारभार करीत असून 2024 नंतरही हेच सरकार येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेनेवर मात्र टिका केली आहे.

मुख्यमंत्री असलेल्या पदाला मान दिला पाहिजे. त्यामुळे ते घेतील त्या निर्णयाचे आपण स्वागत केलं पाहिजे, अशी शिकवण पवारांनी आम्हाला दिल्याचं यावेळी आव्हाड यांनी कबूल केलं आहे.

आघाडी सरकार सुरळीत सुरू असलं तरी स्थानिक पातळीवर सर्व काही अलबेल नसल्याचे संकेतही आव्हाड यांनी दिले आहेत. निवडणूका आल्या की, सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते, असा आरोप त्यांनी केलाय.

राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे? याचे पर्याय खुले असल्याचं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी मनपा अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल, अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता. मात्र आम्ही विरोध केल्यानं आयोगानं वॉर्ड रचनेत बदल होऊन दिले नाहीत. मात्र जर असे मनमानी कृत्य करून वॉर्ड रचना पाडली जात असेल तर ही लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगानं लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असतो. मुख्यमंत्री यांना स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्यात अडचण येते, असं बाहेर पसरवलं जात आहे. मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसून शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा उध्दव ठाकरे यांना असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘….हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे’; जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन 

“CDS बिपीन रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली” 

अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर 

‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं?