एकदाचं झालं… विकी-कतरीना अखेर लग्नबंधनात; पहिला फोटो आला समोर

मुंबई | बॉलिवूडची सुरस्टार जोडी विकी कौशल आणि कतरीना कैफ अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. विकी आणि कतरीनाच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले आहे. त्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. लग्नातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अनेक भन्नाट पोस्ट सध्या विकी आणि कतरीनाच्या लग्नाच्य व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे वर्षातील सर्वात मोठा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसोबत मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला.

लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणा बाहेरील फोटो समोर आले आहेत. विकी आणि कतरिनाने प्रायव्हसीची विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी त्याने पाहुण्यांना आपला फोन हॉटेलच्या खोलीत ठेवण्यास आणि फोटो शेअर न करण्यास सांगितले आहे.

आता लग्नाच्या ठिकाणाचे फोटो व्हायरल होत आहेत ज्यात सुरक्षा कर्मचारी बॅरिकेड्स लावून बाहेर उभे आहेत आणि गेटच्या बाहेर दोन रुग्णवाहिकाही उभ्या असलेल्या दिसत आहेत.

Amazon Prime Videoने विकी -कतरिनाच्या लग्नाचे टेलिकास्ट हक्क 80 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. कॅट आणि विकीने लग्नाआधीच Amazon Primeला टेलिकास्टचे हक्क विकले होते. जोडप्याने त्यांच्या सर्व पाहुण्यांना नॉन डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट (NDA) वर स्वाक्षरी करण्यासाठी देखील आणले आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘….हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे’; जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन 

“CDS बिपीन रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली” 

बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळण्याआधीचा पहिला व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ 

अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर 

‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं?