कोरोना झाल्यावर बेड मिळणार नाही या भीतीनं पत्रकाराची रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या

मुंबई| राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दिवसागणिक आरोग्य सुविधा अपु-या पडू लागल्या आहेत. ऑक्सिजन नाही, रूग्णालयात बेड्स नाहीत, औषधे नाहीत अशा स्थितीत सामान्यजन हवालदिल झाले आहे.

संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

कोरोनाच्या या भयानक वातावरणात अनेक लोकांना घाबरायला होतं. या भितीमुळेच अनेकांनी जीव गमावलेला पहायला मिळत आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे.

कर्नाटकातील एका पत्रकाराने या कोरोनाच्या भीतीतूनच जीव दिल्याचं समजतंय. कोरोना झाल्यावर बेड तर मिळणार नाही, त्यापेक्षा जीव दिलेला बरा असं या पत्रकाराने आपल्याला सांगितलं होतं, असं त्याच्या मित्राने सांगितलं आहे.

कर्नाटकातील दावणगिरी भागात परमेश नावाचा पत्रकार काम करत होता. विजय कर्नाटका या वृत्तपत्रामध्ये तो अर्धवेळ पत्रकार म्हणून कामाला होता. पत्नी आणि दोन मुलांचा बाप असलेला हा 46 वर्षांचा पत्रकार कोरोनाची लक्षणे दिसायला लागल्याने चिंतेत पडला होता.

आपल्याला कोरोना झाला तर उपचारासाठी ऑक्सिजन आणि बेड मिळणार नाही अशी भीती परमेशला वाटत होती. त्याने ही भीती त्याच्या जवळच्या मित्राला बोलूनही दाखवली होती. या भीतीपोटीच त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. भरधाव येणाऱ्या गाडीपुढे स्वत:ला झोकून देत परमेशने जीव दिला.

दरम्यान, कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या – 

रिया चक्रवर्तीच्या काकांचं कोरोनामुळं निधन; पोस्ट शेअर करत…

‘या’ प्राणीसंग्रहालयातील चक्क 8 सिंहांना झाली…

शोकसभेत रडण्यासाठी ‘या’ अभिनेत्याला मिळाली होती…

कोरोना ग्रस्तांसाठी विराट-अनुष्काची खास मोहिम,…

तळ्यावर पाणी प्यायला गेला बिबट्या; त्यानंतर जे घडलं ते पाहून…