न्याय प्रक्रिया सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर- रामनाथ कोविंद

नवी दिल्ली | अनेक कारणांमुळे आपली न्याय प्रक्रिया खर्चिक झाली आहे. त्यामुळे न्याय व्यवस्था गरिबांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. न्यायासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणं सर्वसामान्य कुटुंबासाठी अशक्य होऊन गेलं आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

न्याय सुलभ करण्याचं दायित्व आपण संविधानाद्वारेच स्वीकारलं आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतच ते अंतर्भूत आहे. त्यामुळे आपण सर्वांसाठी न्याय सुलभ करत आहोत का? हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे, असंही कोविंद यांनी म्हटलं आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या भवनाचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

माझ्या सल्ल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या संकेतस्थळावर न्यायालयीन निकालाच्या प्रती नऊ भाषेत द्यायला सुरुवात केल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. न्यायव्यवस्थेशी संबंधित माझं मत लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावं म्हणूनच मी हिंदीत संभाषण करत असल्याचंही शेवटी, रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-