ज्योतिरादित्य शिंदेंच्या हाती कमळ; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

नवी दिल्ली |  काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा हात सोडत पक्षातल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. आज त्यांनी नवी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे यांनी भाजपचं उपरणं गळ्यात घातलं.

दुसरीकडे या पक्षप्रवेशाला गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची अनुउपस्थिती आश्चर्यकारक होती. जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजप राज्यसभेवर संधी देणार असल्याची शक्यता वर्तवली जातीये. तसंच त्यांना केंद्रिय मंत्रीपदाची देखील संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, सिंधिया यांचा भाजप प्रवेश हा निश्चित काँग्रेसला मोठा धक्का आहे. मी मोदी-शहा आणि नड्डा यांचा आभारी आहे की मला त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निमंत्रण दिलं, असं सिंधिया म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-आता शरद पवारांचाही बाप काढणार का?; गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

-“…म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री सोडून वर्षा बंगल्यावर जाणार नाहीत”

-“चिंता नसावी, महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे, मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही”

-जे करायला नको तेच केलं; महाराजावर गुन्हा दाखल

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सुट्टी नाहीच