आता शरद पवारांचाही बाप काढणार का?; गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केल्यानंतर आता टीकेची पातळी बापापर्यंत येऊन पोहोचली आहे.

एकाएकी कोण पक्ष बदलत नाही. जनतेसाठी, विकासकामांसाठी, स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. आपल्या आधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्षबदल केला आहे. मग पवार साहेबांची गणना देखील तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का? असा प्रतिप्रश्न गणेश नाईक यांनी केला आहे. त्या-त्या वेळेची गरज म्हणून पक्ष बदलले जातात, असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे.

पक्ष बदण्याच्या भूमीकेवरुन गणेश नाईकांवर टीका करताना, मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी काल म्हटलं होतं. त्यावर बोलताना, पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी विचारला आहे.

खालच्या स्थरावर टीका केली जाऊ नये, असंही गणेश नाईकांनी म्हटलं. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांचे जोरदार वाकयुद्ध सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“…म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री सोडून वर्षा बंगल्यावर जाणार नाहीत”

-“चिंता नसावी, महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे, मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही”

-जे करायला नको तेच केलं; महाराजावर गुन्हा दाखल

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सुट्टी नाहीच

-#CoronaVirus I ‘त्या’ 11 जणांना बाहेर न पडण्याच्या सूचना