‘मोहनदास करमचंद गांधीनं सत्यानाश केला’; कालीचरण महाराजाचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्यांनी व्यासपीठावरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ केलीये. कालीचरण महाराजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

महाराजाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासाठी अपशब्द वापरल्याचं दिसतंय. व्हिडीओत कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय.

देशभरात सध्या विविध ठिकाणी धर्मसंसदेचं आयोजन केलं जातंय. त्यातली छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली, त्यात कालीचरण महाराजानं हे तारे तोडलेत. काँग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.

रविवारी संध्याकाळी गांधींविरोधात वक्तव्य करणाऱ्या संत कालीचरण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. रायपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय धर्म संसदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही अचानक या कार्यक्रमातून निघून गेले.

दरम्यान, कालीचरण महाराज यांनी याआधी देखील वादग्रस्त वक्तव्य केलंय. काही दिवसांपूर्वीच कोरोना (Corona) म्हणजे फर्जीवाडा असल्याची मुक्ताफळे त्यांनी इथे उधळली.

इतकंच काय कोरोनाचे मृत्यू म्हणजे डॉक्टरांनी लोकांना मारलं. त्यांच्या किडनी आणि अवयवांची तस्करी केली, असा जावई शोध कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी लावला आहे.

तिसरी लाट येऊन राह्यली आणि ही लाट येऊन राह्यली. त्यांच्या कंपन्या आहेत व्हॅक्सीनच्या. त्या तिसऱ्या लाटेच्या नावाखाली धडाधड व्हॅक्सीन बनवतात आणि त्या खपवतात. दुसरं काय हाय? हा कोरोना म्हणजे एक मोठे षढयंत्र आहे, असा दावा कालीचरण महाराज यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

विषारी साप मला तीन वेळा चावला, सापाने मला बर्थडे गिफ्ट दिलं- सलमान खान 

‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोना, वेळीच व्हा सावध! 

“…तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो” 

नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न केले जातायेत – नारायण राणे 

विधानसभेत कोरोनाचा शिरकाव! अधिवेशनातील ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण