“संपूर्ण बॉलिवूडने कनिका कपूरवर बहिष्कार टाकावा”

मुंबई | बेबी डॉल’ या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली गायिका कनिका कपूर सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. लंडहून परतलेल्या कनिकाला करोना विषाणूची लागण झाली. तिने ही गोष्ट इतरांपासून लपवून ठेवली. यामुळे तिच्यावर आता जोरदार टीका केली जात आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता कमाल खानने तिच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

संपूर्ण बॉलिवूडने कनिका कपूरवर बहिष्कार टाकावा. भविष्यात तिला कुठल्याच निर्मात्याने काम देऊ नये. आपण सर्वांनी समाजाच्या हितासाठी जबाबदार असले पाहिजे, असं कमाल खानने म्हटलं आहे.

सोनम कपूर विषकन्या कनिकाला पाठिंबा देत आहे. तिच्या सोबत नेहा धुपिया देखील आहे. या दोघी पृथ्वीवरील सर्वात मुर्ख मुली आहेत. त्या वाईट अभिनेत्री तर आहेतच शिवाय माणूस म्हणून देखील त्या वाईट आहेत, असं म्हणत केआरकेने कनिकाला पाठिंबा देणाऱ्या नेहा आणि सोनमवर टीका केली आहे.

आपण कनिकावर बहिष्कार टाकूया कारण ती या समाजाची शत्रू आहे, असं ट्विट कमाल खान उर्फ केआरकेने केलं आहे. आवाक् करणारी बाब म्हणजे त्याने कनिकाला पाठिंबा देणाऱ्या नेहा धुपिया आणि सोनम कपूरवरही निशाणा साधला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या – 

-करोनाबाधित 75 शहरं लॉकडाऊन करा; मोदी सरकारचे राज्यांना आदेश

-महाराष्ट्र लॉकडाऊन मात्र… ‘या’ गोष्टींची दुकाने चालू राहणार!

-“आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू “

-कोरनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय देशातली रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद

-मोठी बातमी… मुंबईतली लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत बंद