दिल्लीत काँग्रेसची धुळधाण झाल्यानंतर काँग्रेस नेत्याची आश्चर्यकारक प्रतिक्रिया

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. 70 जागांपैकी आप 60 जागांवर आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसला सलग दुसऱ्या निवडणुकीत आपलं खातं उघडता आलेलं नाहीये. यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पत्रकरांशी बोलताना अजब प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीमध्ये काँग्रेसचं काय होणार याची कल्पना आम्हाला अगोदरच होती, असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपच्या मोठमोठ्या दाव्यांचं काय झालं?, असा प्रतिसवाल कमलनाथ यांनी भाजपला केला.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खूप कष्ट घेतले. तरीही अपयश आलं. मात्र प्रत्येक निवडणुक शिकवत असते, असं काँग्रसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे निवडणुका या अशा असतात की प्रत्येक पक्षाने यामध्ये ताकद लावायची असते. दिल्लीचं क्लिअर विश्लेषण असं आहे की भाजपला देशभर एकटं पाडण्यासाठी अनेक पक्ष एकत्र येत आहेत. त्यांना माझं आव्हान आहे की हिम्मत असेल तर भाजपसमोर वेगवेगळं लढा. काँग्रेसने दिल्लीत मॅचफिक्सिंग केली आहे, असा आरोप महाराष्ट्र भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही- शरद पवार

-भाजप देशावरची आपत्ती… त्यांच्या पराभवाची मालिक आता थांबणार नाही- शरद पवार

-दिल्ली निवडणुकीत काँग्रेसने मॅचफिक्सिंग केली आहे- चंद्रकांत पाटील

-दिल्लीत भाजपला पराभव अन् आपच्या विजयानंतर शरद पवार यांचं ट्वीट; म्हणतात…

-दिल्लीत काँग्रेसला शरद पवार मिळाले नाहीत??; रोहित पवार म्हणाले….