राज ठाकरेंच्या भाषणांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही- शरद पवार

मुंबई |   लोकसभेवेळी निवडणुकीवेळी मोदी-शहांवर कडाडून हल्ला चढवणारे राज ठाकरे यांनी आता त्यांचा अजेंडा आणि झेंडा बदलला आहे तो बदलताच आणि हिंदुत्वाची हाल पांघरताच राज ठाकरेंच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. केजरीवालांनी पुन्हा एकदा भाजपला धोबीपछाड देत दिल्लीकरांची मनं जिंकली आहे. शरद पवार यांनी दिल्लीच्या निकालावर बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

काही लोकं भाषणे ऐकण्यासाठी तर काही लोकं फक्त भाषण बघायला येतात. भाषणांना गर्दी झाली म्हणजे मतं मिळतात असं नाही. त्यामुळे राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही, असं पवार म्हणाले.

दुसीरकडे भाजप ही देशावर आलेली आपत्ती आहे. या आपत्तीला थोपवण्यासाठी आता प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकापाठोपाठ एक भाजपचा पराभव होत आहे. त्यांच्या पराभवाची मालिक आता थांबणार नाही, असं भाकित त्यांनी वर्तवलं.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजप देशावरची आपत्ती… त्यांच्या पराभवाची मालिक आता थांबणार नाही- शरद पवार

-दिल्ली निवडणुकीत काँग्रेसने मॅचफिक्सिंग केली आहे- चंद्रकांत पाटील

-दिल्लीत भाजपला पराभव अन् आपच्या विजयानंतर शरद पवार यांचं ट्वीट; म्हणतात…

-दिल्लीत काँग्रेसला शरद पवार मिळाले नाहीत??; रोहित पवार म्हणाले….

-दिल्लीत सुफडासाफ झाल्यानंतर रोहित पवार यांचा काँग्रेसला सल्ला; म्हणाले…