भर कार्यक्रमात कंगनाने हृतिकवर साधला निशाणा, म्हणाली “घसा सुकतोय पण…”

मुंबई | आपल्या आदाकारीनं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणून कंगना राणावतला ओळखण्यात येत. कंगणा सातत्यानं चर्चेत देखील असते.

गेल्या काही काळापासून कंगना अभिनयापेक्षा राजकीय वक्तव्यांमुळं चर्चेत राहिली आहे. सध्या कंगना आपल्या नवीन शोमुळं चर्चेत आहे.

कंगना आता लाॅक अप या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर रिलीज होत असलेल्या शोमध्ये सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. परिणामी कंगनाची चर्चा होताना दिसतेय.

कंगना राणावतनं परत एकदा पुर्वाश्रमीचा बाॅयफ्रेंड ह्रतिक रोशनला नाव न घेता डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ह्रतिकला कंगनानं त्याच्या सहाव्या बोटावरून डिवचलं आहे.

सध्या कंगनाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत कंगना अनेक खुलासे करताना दिसत आहे. परिणामी या व्हिडीओची चर्चा होत आहे.

माझ्या या शोमुळं सर्वांच्या मनात धडकी भरली आहे, असं कंगना म्हणत आहे. काही लोक मला भेटवस्तू पाठवत आहेत. कंगनाचं मन राखून ठेवूयात, असं म्हणत आहेत.

मी लोकांची पोल खोलेल असं त्यांना वाटत आहे. लोक पाच बोट जोडून मला हात जोडत आहेत. तर सहा बोट असलेल्याचाही घसा सुखावत आहे, असं कंगना म्हणाली आहे.

दरम्यान, कंगनाच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट करत आहेत. एका युझरनं कंगनाला सर्वात वाईट एक्स गर्लफ्रेंड पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.

पाहा व्हिडीओ – 


महत्त्वाच्या बातम्या – 

 नवरा असो किंवा बाॅयफ्रेंड मुली कधीच सांगत नाहीत ‘हे’ पाच सिक्रेट

8 लाखाच्या आत मिळतीये 7 सीटर आरामदायी कार; Kia Carens सह ‘या’ 4 गाड्यांना जोरदार मागणी

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे होतोय ‘या’ कंपन्यांना फायदा; वाचा सविस्तर

लवकरच 2022 Maruti S-Cross भारतीय बाजारात धडकणार; जाणून घ्या फिचर्स

हाडं मजबूत करायची असतील तर आहारात करा ‘या’ 9 गोष्टींचा समावेश; म्हातारपणात त्रास नको