उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

मुंबई | आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. अनेक क्षेत्रासांठी आज मोठमोठ्या घोषणा केल्या. मागील काही दिवसांपासून विधीमंडळात गोंधळाची परिस्थिती होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह बाॅम्ब फोडल्यानंतर अधिवेशनात तसेच बाहेर देखील मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं.

मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेली अटक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भ्रष्टाराचाविरोधात कारवाई व्हावी की नाही? पण काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत, असं मोदी म्हणाले होते. त्यावरून आता महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आता उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यावेळी अजित पवार देखील त्याबैठकीत उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार राजभवनावर गेले होते.

दरम्यान, भाजपने राज्यातील महाविकास आघाडी लवकरच पडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता दोन्ही बाजूने सुरू असलेल्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“आताच बसलोय, परत या”, सोशल मीडियावर आज दिवसभर फक्त ‘या’ व्हिडीओचीच चर्चा

नवरा असो किंवा बाॅयफ्रेंड मुली कधीच सांगत नाहीत ‘हे’ पाच सिक्रेट

8 लाखाच्या आत मिळतीये 7 सीटर आरामदायी कार; Kia Carens सह ‘या’ 4 गाड्यांना जोरदार मागणी

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे होतोय ‘या’ कंपन्यांना फायदा; वाचा सविस्तर

लवकरच 2022 Maruti S-Cross भारतीय बाजारात धडकणार; जाणून घ्या फिचर्स