“कंगना एक महान व्यक्ती आहे, त्यांचा आदर करणं आपलं कर्तव्यच”

मुंबई | अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती आपल्या अभिनयामुळे जेवढी चर्चेत असते त्यापेक्षा जास्त ती आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते.

कंगनानं नुकतंच देशाच्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वातावरणही खूप तापलं. देशभरातून तिच्यावर टीकेची झोड होत आहे.

‘भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. स्वातंत्र्याविषयी केलेलं हे वक्तव्य कंगनाला चांगलंच महागात पडलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी तिला तर धारेवरच धरल्याचं चित्र आहे.

कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यानं आता कृषिमंत्री दादा भुसे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. माननीय कंगनाताई या महान व्यक्तीमत्त्व आहेत, आपल्या संस्कृती प्रमाणे त्यांचा आदर करणे आपलं कर्तव्य आहे. मात्र कोणाच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं हे ही लक्षात घेतलं पाहिजे, असं म्हणत दादा भुसे यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.

दादा भुसे यांनी पुढे म्हटलं की, हजारो स्वातंत्र्यवीर, हुतात्मे यांच्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र मिळाले आहे. याचे भान कोणी ठेवणार नसेल तर याला काय म्हणावं.

कंगनानं केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी केली जात आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तिनं स्वातंत्र्याबद्दल केलेल्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत.

आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी तिच्या या वादग्रस्त वक्तव्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे देशभरातून तिच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता पुन्हा एकदा कंगनानं गांधीजींवर निशाणा साधला आहे. पुन्हा एकदा तिनं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, सरकारनं त्यांना विशेष सुरक्षा द्यावी”

  “अजित पवारांना हात लावता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणीवर कारवाई केली”

  “अनिल देशमुखांच्या तुरूंगातील प्रत्येक तासाची किंमत भाजपला मोजावी लागेल”

रोहितची विजयी सलामी! रोमांचक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

काँग्रेसला धक्क्यावर धक्के! 4 माजी मंत्री आणि 3 माजी आमदारांनी ठोकला रामराम