“गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, सरकारनं त्यांना विशेष सुरक्षा द्यावी”

मुंबई | राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप हे नेहमीच पहायला मिळतात. अशातच भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवत आहेत. त्यामुळे यावरुनही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळत चालला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून हा संप सुरु असून अद्याप हा संप काही मागे घेतला नाही. यातच भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी या संपाला पाठिंबा दर्शवला आहे.

गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबईत आहेत. मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे.

गोपीचंद पडळकर यांच्यावर अनेक हल्ले होत आहेत. सरकारविरूद्ध बोलत असल्यानं गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये हल्ले झाले. याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्यावर होणारे हल्ले पाहता फडणवीस यांनी सरकारला विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारनं तात्काळ आमदार पडळकर यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रात केला आहे.

राज्य सरकार भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाहीत. हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “अजित पवारांना हात लावता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणीवर कारवाई केली”

  “अनिल देशमुखांच्या तुरूंगातील प्रत्येक तासाची किंमत भाजपला मोजावी लागेल”

रोहितची विजयी सलामी! रोमांचक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

काँग्रेसला धक्क्यावर धक्के! 4 माजी मंत्री आणि 3 माजी आमदारांनी ठोकला रामराम

अखेर परमबीर सिंह फरार घोषित; आता उरले फक्त 30 दिवस