तुकडे तुकडे गँगला माझं कधीच समर्थन नाही…त्यांना माझा विरोधच; कंगणाचा दीपिकाला टोला

मुंबई |  दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये पंधरा दिवसांपूर्वी काही हल्लेखोरांनी विद्यापीठातल्या आणि वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट होती. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने विद्यार्थ्यांची भेट घेत आपला पाठिंबा दिला होता. परंतू तिचं जेएनयूमध्ये जाणं अभिनेत्री कंगणा राणावतला रूचलेलं दिसत नाही.

मी तुकडे तुकडे गँगचं कधीच समर्थन करणार नाही. माझा त्यांना नेहमीच विरोध राहिन, असं म्हणत तिने दीपिकाला टोला लगावला आहे. काय करावं? कुठं जावं? हा दीपिकाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. मी यावर बोलणार नाही परंतू माझा त्यांना विरोध असेल, असं तिने म्हटलं आहे.

आपले जवान शहीद झाल्यानंतर त्याचं जे सेलिब्रेशन करतात, अशांचा मी विरोधच करते, असं तिने म्हटलं आहे. देशाचं समर्थन करणाऱ्यांचं समर्थन करणं चुकीचं आहे, असं मतंही तिने व्यक्त केलं आहे.

दरम्यान, कंगणाच्या या टीकेला दीपिका आता काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-साई जन्माचा वाद चिघळला, शिर्डीकरांची बेमुदत बंदची हाक!

राज ठाकरेंनी इरादा बदलताच जुने भिडू पक्षात परत?? या दोन महत्वाच्या नेत्यांनी घेतली भेट

…म्हणून आमदार महेश लांडगेंच्या डोळ्यात पाणी आलं- चंद्रकांत पाटील

राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे?; आदित्य ठाकरेने दिले हे उत्तर…

“जेव्हा मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली तेव्हा गप्प का होता?”