पंजाब मधील रस्त्यावर कंगना राणावतची शस्त्रक्रिया; फोटो व्हायरल

नवी दिल्ली | अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगना काही तरी बोलली आणि वाद झाला नाही, असं क्वचितंच घडत असेल. कंगना सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त वक्तव्य करत असते. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला भरपूर नुकसान देखील सहन करावं लागलं आहे.

पुन्हा एकदा कंगनाची काही वक्तव्य तिच्या चांगलीच अंगलट आली आहेत. सध्या चालू असणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून कंगना सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त विधानं करत आहे. यामुळे कंगनाला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. दिल्लीत चालू असणाऱ्या या शेतकरी आंदोलनात सीख समुदयाचे लोक देखील मोठ्या प्रमाणात सामील झाले आहेत.

कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी सतत काही न काही बरळत असल्यामुळे काही लोक कंगनाची खिल्ली उडवत आहेत. कंगना संबंधित अनेक कॉमेडी पोस्ट आणि मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता पंजाब मधील काही लोकांनी पंजाबच्या रस्त्यावर कंगनाच्या डमीची शस्त्रक्रिया केल्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

व्हायरल होणाऱ्या फोटोत एका डमीची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या डमीवर कंगनाचे काही फोटोज लावण्यात आले आहेत. तसेच यावर एक फ्लेक्स देखील लावण्यात आला आहे. ज्यावर लिहिलं आहे, ऑपरेशन थिअटर, ब्रेन सर्जरी रुग्णाचे नाव – कंगना राणावत.

पंजाबमधील रस्त्याच्या कडेला चाललेल्या कंगनाच्या या शस्त्रक्रियेचे अनेक लोक फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. तसेच यावर कॉमेडी कमेंट्स देखील करत आहेत.

दरम्यान, नुकतंच कंगनाने दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सामील झालेल्या एका वयोवृद्ध आजींवर कमेंट करत सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली होती.

कंगनाने या आजींवर कमेंट करताना म्हटलं होतं की, दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सामील होणाऱ्या आजी शेतकरी आंदोलनात देखील सामील झाल्या आहेत. 100 रुपयांसाठी त्या आंदोलनात भाग घेतात.

कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिला ट्रोल करण्यात येवू लागल्यानंतर तिने ही पोस्ट डिलीट केली होती. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या आजींवर कमेंट करत कंगनाने वादग्रस्त वक्तव्य केल्यानं अनेक लोक कंगनावर टीका करू लागले आहेत. तसेच अनेक लोक कंगनाने माफी मागावी, अशी देखील मागणी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांचं राज ठाकरेंबद्दल मोठं विधान! ठाकरेंची प्रशंसा करत पवार म्हणाले…

कोरोनाकाळात ‘या’ राज्याचा मोठा निर्णय! 31 मार्च पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद राहणार

डॉ. शितल आमटे प्रकरणाला धक्कादायक वळण! पोलिसांना आढळले सबळ पुरावे

आता एक रुपयाही न भरता घेऊ शकता चारचाकी; ही कंपनी देतेय ऑफर!

कोरोनाचा सामना करायचाय?; ‘या’ तीन गोष्टीचा करा आहारात समावेश!