शरद पवारांचं राज ठाकरेंबद्दल मोठं विधान! ठाकरेंची प्रशंसा करत पवार म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी सातत्यानं चालूच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील राज्य सरकावर टीका करत आहेत. मात्र, अशातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंविषयी महत्वाचं विधान केलं आहे.

१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत पवारांना राज ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता तुम्ही राज ठाकरेंबद्दल काय विचार करता? असा सवाल शरद पवार यांना विजय दर्डा यांनी केला होता. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष स्वातंत्र्य पक्ष आहे.

राज ठाकरे स्वातंत्र्यपणे आपली मतं मांडतात. तसेच त्यांना पाठींबा देणारा तरुणांचा एक मोठा वर्ग आहे. निवडणुकीमध्ये त्यांना हवं तस यश मिळालं नसेल. पण याचा अर्थ तरुणांचा राज ठाकरे यांच्याबद्दल क्रेझ गेला असं मी मानणार नाही, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जात होतं. मात्र, या गोष्टीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावेळी सफाईदारपणे उत्तर दिलं आहे.

माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांचा रस देशाच्या राजकारणात आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच संसदरत्न पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो यामुळे सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यातील राजकारणात नसून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आहे, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, भविष्यात जर केव्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवण्याची वेळ आली तर शरद पवार अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा चालू झाली होती. मात्र, या चर्चांना शरद पवार यांनी आता पूर्णविराम दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाकाळात ‘या’ राज्याचा मोठा निर्णय! 31 मार्च पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद राहणार

डॉ. शितल आमटे प्रकरणाला धक्कादायक वळण! पोलिसांना आढळले सबळ पुरावे

आता एक रुपयाही न भरता घेऊ शकता चारचाकी; ही कंपनी देतेय ऑफर!

कोरोनाचा सामना करायचाय?; ‘या’ तीन गोष्टीचा करा आहारात समावेश!

कोरोना लशीबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा! पहा कोणाला मिळणार विनामूल्य लस?