“अनुराग आणि तापसी हे फक्त टॅक्स चोर नाहीत तर दहश.तवादी देखील आहेत” – कंगणा राणावत

नवी दिल्ली | अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगना काही तरी बोलली आणि वाद झाला नाही, असं क्वचितंच घडत असेल. कंगना सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त वक्तव्य करत असते. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला भरपूर नु.कसान देखील स.हन करावं लागलं आहे.

कंगणा सोशल मिडीयावरुन सतत कोणावर तरी टिका करताना दिसते. मग ते राजकरणी असोत किंवा बॉलिवूड मधील कलाकार, ती अनेकांबद्दल काही न काही वादग्रस्त वक्तव्य करते. अशातच आता कंगणाने अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपवर देखील पुन्हा एकदा गंभीर टिका केली आहे.

नुकतंच बुधवारी अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान 370 कोटींच्या टॅक्सी चो.रीची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर कंगणाने अनुराग आणि तापसीवर टिका केली आहे.

यासंबंधीत कंगणाने सोशल मिडीयावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. तसेच कंगणाने यासोबत काही प्रेस नोट देखील सोशल मिडीयावर शेअर केल्या आहेत. तिने तापसी आणि अनुरागला दहश.तवादी म्हटलं आहे.

कंगणा ट्वीट करत म्हणाली की, चोर फक्त चोरच असतात. मात्र, जे मातृभूमीला विकून त्याचे तुकडे करतात ते ग.द्दार असतात. जे ग.द्दारांना मदत करतात तेही चोरच असतात. चोर-चोर मामे भाऊ आणि चोर ज्यांना घाबरतात, त्यांना नरेंद्र मोदी म्हणतात.

तसेच कंगणा पुढे आणखी एक ट्वीट करत म्हणाली की, हे फक्त टॅक्स चोर नाहीत तर यांनी काळ्या पैशाची मोठी देवाण-घेवाण केली आहे. यांना शाहीनबाग दं.गल किंवा 26 जानेवारी रोजी हिं.सा भडकवण्यासाठी पैसे मिळाले होते का? काळा पैसा कुठून आला आणि कुठे पाठवला, याचा हिशोबच नाही.

प्रत्येक मिनिटाला हा आकडा वाढत आहे. हेच ते पैसे आहेत ज्यांचा क्लू मिळाला आहे. आपण विचारही करू शकत नाही की मनी लॉ.न्ड्रिंगचा खरा आकडा काय असेल. या तुकडे-तुकडे गँगच्या द.हशतवादावरुन पडदा बाजूला होत आहे. हे फक्त कर चोर नाहीत तर दहश.तवादी आहेत, अशी टिका कंगणा राणावतने केली आहे.

दरम्यान, अद्याप तापसी आणि अनुराग या दोघांनी कंगणाला काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. हे दोघे याप्रकरणी पुढे काय बोलणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

राखीने शेअर केला बाथरुममधील ‘तो’ व्हिडिओ, पाहाल तर तुम्ही देखील हसून लोटपोट व्हाल

…म्हणून उद्धव ठाकरेंनी अद्याप कोरोनाची लस घेतली नाही; अखेर कारण आलं समोर

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…; अमृता फडणविसांचं आणखी एक नवं गाणं

ऐकावं ते नवलंच! रुसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी पठ्ठ्यानं केला धक्कादायक कारनामा

लोचा झाला रे! लग्नासाठी ती चार तरुणांसोबत पळाली अन् मग घडला ‘हा’ विचित्र प्रकार