पेट्रोल-डिझेलच्या दरात लवकरंच होणार घट? अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या…

नवी दिल्ली | अलिकडे काही वर्षांमध्ये पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. सोशल मिडीयावर देखील वाढत्या दरांवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

अनेक राज्यांमध्ये तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोलच्या पाठीमागे डिझेलचा दर देखील शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. कोरोनामुळे अगोदरच सामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडलं आहे. यात पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत.

इंधनांवर आकारले जाणारे कर कमी करण्यात यावेत, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. देशातील जणतेचा संताप पाहता केंद्र सरकार देखील पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करायचा विचार करत असल्यांचं दिसत आहे. असे संकेत केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहेत.

यावेळी निर्मला सीतारामण म्हणाल्या की, पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळून विचार करायला हवा. इंधनाच्या किंमतीवर एक्ससाईज ड्युटी लागते. याचा जवळपास ४१ टक्के हिस्सा राज्यांकडे असतो.

यामुाळे किंमत वाढीसाठी केवळ केंद्र सरकार जबाबदार आहे, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. केवळ केंद्र सरकार यावर शुल्क आकारत नाही राज्य सरकार देखील आकारते, असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पेट्रोलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 60 टक्के कर आकारला जातो. तसेच डिझेलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 54 टक्के कर आकारला जातो. हे कर सरकारने कमी केल्यास पेट्रोल, डिझेलचे दर खाली येवू शकतात.

पेट्रोल डिझेलचे वाढते दर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याचे केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराचे खापर पूर्वीच्या सरकारवर फोडत आहे. इंधनाच्या वाढत्या भावावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. मात्र, सामान्य नागरीकच यामध्ये चेपला जात आहे.

पेट्रोल दरवाढ हा एक राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. पेट्रोल दरवाढीवरुन नेटकरी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. तसेच देशभरातून इंधनाचे दर कमी व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

“अनुराग आणि तापसी हे फक्त टॅक्स चोर नाहीत तर दहश.तवादी देखील आहेत” – कंगणा राणावत

राखीने शेअर केला बाथरुममधील ‘तो’ व्हिडिओ, पाहाल तर तुम्ही देखील हसून लोटपोट व्हाल

…म्हणून उद्धव ठाकरेंनी अद्याप कोरोनाची लस घेतली नाही; अखेर कारण आलं समोर

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…; अमृता फडणविसांचं आणखी एक नवं गाणं

ऐकावं ते नवलंच! रुसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी पठ्ठ्यानं केला धक्कादायक कारनामा