कन्नड संघटनेचा ‘तानाजी’ला विरोध; चित्रपटगृहावरील पोस्टर उतरवले

मुंबई | अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘तानाजी: द अनसंग वाॅरिअर’ चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित झाला. बाॅक्स ऑफीसवर हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. मात्र, या चित्रपटाला कर्नाटकमध्ये विरोध होत असून काही ठिकाणी चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न झाला आहे.

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या (कनसे) कार्यकर्त्यांनी चित्रपटाबाहेरील पोस्टर उतरवल्याने वाद निर्माण झाला आहे. बेळगावमधील ग्लोब चित्रपटगृहावरील पोस्टर उतरवण्यात आले आहेत. त्याचबरोबर कनसेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी केली. त्यामुळे एकच गोंधळ माजला होता.

बेळगावसह धारवाड, दावनगिरी येथेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध झाला आहे. याची माहिती मिळताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ चित्रपटागृहाबाहेर जाऊन ‘तानाजी’चे पोस्टर लावले. तसेच फटाकेही फोडले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.

दरम्यान, तानाजी हा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 18 कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे अजय देवगणचा हा 100 वा चित्रपट आहे.

महत्वाच्या बातम्या-