आजच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्या; महाआघाडीचे वकील कपील सिब्बल यांची मागणी

नवी दिल्ली | देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घेतलेल्या शपथविधीच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यावर आज सुनावणी होत असून महाविकास आघाडीकडून कपील सिब्बल न्यायालयात बाजू मांडत आहेत.

अधिवेशन बोलावून विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडाला जावा आणि भाजपला आजच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्यात यावा,  अशी मागणी कपील सिब्बल यांनी लावून धरली आहे. कुठल्याही प्रकारचं बहुमत नसताना शपथविधी कार्यक्रम पार पडला, असं सिब्बल म्हणाले आहेत.

सकाळी 5:30 वाजता राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. इतिहासात असं कधीच घडलं नाही.  त्यानंतर काही वेळातच शपथविधी पार पडला. दोन तासात कशी काय राज्यपालांना खात्री पटली, असा प्रतिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे.

राज्यपालांना इतक्या कमी वेळात बहुमताची खात्री कशी झाली? राष्ट्रपती राजवट हटवल्यानंतर अवघ्या दोन तासात शपथविधी कसा पार पडला. राज्यपालांना केव्हा पाठिंब्याचे पत्र देण्यात आले होते. सर्व आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा आहे अशी राज्यपालांना खात्री झाली होती का?, असे सवाल सिब्बल यांनी न्यायालयात केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-