‘दोष माझाच आहे मी त्याच्या…’; सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरची भावूक पोस्ट

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीला धक्काच बसला आहे. सुशांतने त्याच्या वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावूक पोस्ट केली आहे.

दोष माझाच आहे मी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या संपर्कात नव्हतो. मला कधीकधी असं वाटायचे की त्याला आयुष्यातील गोष्टी शेअर करण्यासाठी कोणी तरी हवं आहे. पण तरीही मी त्या भावनांचा पाठपुरावा कधीच केला नाही, असं करण जोहर म्हणाले आहे.

मी अशी चुक पुन्हा करणार नाही, असंही करणने त्याच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. तसेच सुशांत खपू काही शिवकून गेला असंही करणा म्हणाला आहे.

दरम्यान,  ही पोस्ट शेअर करत करणने त्याचा आणि सुशांतचा एका पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘सुशांत नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार होता’; कुटुंबातील व्यक्तीचा खुलासा

-फळं आणि भाज्यांद्वारेही पसरु शकतो कोरोना; अशी घ्या काळजी

-भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ महिन्यापर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा प्रभाव!

-“गेली तीन महिने सतत काम करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान”

-…म्हणून महाराष्ट्रात कोरोनाने हाहा:कार माजला- बबनराव लोणीकर