‘सुशांत नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार होता’; कुटुंबातील व्यक्तीचा खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पण वयाच्या 34 व्या वर्षी सुशांतने जगाचा निरोप घेतल्याने चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तो नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार होता असं म्हटलं आहे. पण सुशांत कोणाशी लग्न करणार होता हे अद्याप समोर आलेलं नाही.

गेल्या काही दिवसांपासून सुशांत नैराश्यामध्ये असल्याचे म्हटले जाते. त्याची हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरु होती. गेल्या तीन दिवसांपासून सुशांतला बरे नसल्याचे त्याच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल माहिती मिळाली नाही.

महत्वाच्या बातम्या-

-फळं आणि भाज्यांद्वारेही पसरु शकतो कोरोना; अशी घ्या काळजी

-भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ महिन्यापर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा प्रभाव!

-“गेली तीन महिने सतत काम करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान”

-…म्हणून महाराष्ट्रात कोरोनाने हाहा:कार माजला- बबनराव लोणीकर

-मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले- राज ठाकरे