“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट”

बंगळुरू | कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल (Viral Video) झाला होता. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती.

बंगळुरुतील एक चौकातील हा पुतळा असून, त्याची गुरुवारी रात्री विटंबना करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या घटनेचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करण्यात आला होता.

कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक केलं आहे.

विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं वक्तव्य बोम्मई यांनी केल्यानं आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.

रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही, असं बोम्मई म्हणाले.

दरम्यान, कर्नाटकातील पोलिसांना या संपूर्ण घटनेप्रकरणी कायद्याचं उल्लंघन करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांना या घटनेकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.

दरम्यान, बंगळुरुतील या घटनेचा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून निषेध केला जातोय. या घटनेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये कर्नाटकातील गाडी खासगी गाड्यंची तोडफोड केली आहे. तर तिकडे बेळगावातही शिवप्रेमींची अडवणूक करण्यात आली आहे.

शिवाजी गार्डन इथं छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या शिवप्रेमींनी कर्नाटक पोलिसांनी रोखलं होतं. या तणावाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम बेळगावात लागू करण्यात आलं असून मोठा पोलीस फौजफाटाही या भागात पाहायला मिळतोय.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा” 

रोहित पाटलांच्या ‘बघून घेतो’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले… 

महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर; Omicron बाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा 

“शरद पवारसाहेब झुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत” 

‘बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला, म्हणाले…