कंगना राणावतला अ.टक होणार? न्यायालयानं ‘त्या’ प्रकरणी दिला महत्वाचा आदेश

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगना आणि वा.द हे समीकरण काय नवीन नाही. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर कंगनानं बॉलीवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या गोष्टींसह काही पक्षांवरही उघडपणे टी.का केली आहे. कंगना काहीतरी बोलली आणि वा.द झाला नाही, असं क्वचितच घडत असेल.

बॉलीवूड मधील नेपोटीझमचा मुद्दा असो किंवा महाराष्ट्र सरकार, कंगना नेहमीच उघडपणे आ.रोप करत असते. कंगना नेहमी ट्वीटरवरून अनेकांवर निशाणा साधत असते. मात्र, आता एक ट्वीट कंगनाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कंगनाच्या एका ट्वीटमुळे तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं अतिशय महत्वाची तीन कृषी विधेयकं संमत केली होती. केंद्र सरकारनं संमत केलेल्या कृषी विधेयकांवरून देशातील अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले होते. यावेळी कंगनानं ट्वीट करत शेतकऱ्यांवर निशाणा साधला होता. या ट्वीटमुळे कंगनावर अनेक लोकांनी टीका केली होती. यामुळे काही काळानं कंगनानं हे ट्वीट डिलीट केलं होतं.

मात्र, बॉलीवूड क्वीनच्या या ट्वीटमुळे तिच्याविरुद्ध कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कंगनानं ट्वीट करत शेतकऱ्यांचा अपमान केला, असा आरोप कंगनावर करण्यात आला आहे. कर्नाटक कोर्टाने कंगना विरुध्द एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

कंगना राणावतवर कर्नाटक मधील तुमकुर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कंगनावर आयपीसी कलम 108, 153 ए आणि 504 अन्वये गु.न्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान,शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना राणावत यांच्यामध्ये मधल्या काळात आ.रोप प्रत्या.रोपाची चांगलीच खेळी रंगली होती. सोमवारी कंगनानं पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टी.का केली होती. कंगनानं ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता.

मुंबईत सोमवारी सकळी काही वेळासाठी वीजपुरवठा ठप्प झाला होता. तसेच नुकतंच स्टँड अप कॉमेडीअन कुणाल कामरा यानं संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेतली होती. कंगनानं याच मुलाखती दरम्यानचा संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचा फोटो ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.

एकीकडे मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार क क कंगना करण्यात व्यस्त आहे, असं ट्वीट कंगनानं केलं होतं. कंगनानं ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला असला तरी अद्याप संजय राऊत यांनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीची दादागिरी आता इतकी वाढलीय का?; त्याच्या धाकानं अंपायरनं चक्क निर्णय बदलला!