मुंबई | सध्या कोरोना (Corona) रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत (Third Wave) जीवीतहानी होण्याचं प्रमाण पहिल्या दोन्ही लाटेच्या तुलनेत कमी आहे.
अशातच कर्नाटकातील शिवमोग्गा येथे पुन्हा एका जुनाट आजाराने पुन्हा डोकं वर काढलं आहे. शिवमोग्गामधील तीर्थहल्ली येथील कुडिगे गावात 57 वर्षीय महिलेला क्यासानूर फॉरेस्ट डिजीज या रोग झाल्याचं निदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
क्यासानूर फाॅरेस्ट डिजीज (Kasanur Forest Disease) या रोगाला मंकी फिवर (Monkey Fever) देखील म्हटलं जातं. 2019 मध्ये या रोगाचे पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता एका महिलेला हा रोग झाल्याचं समजत आहे.
या महिलेला काही दिवसांपासून ताप येत होता, त्यानंतर तिच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये तिला क्यासानूर फॉरेस्ट डिजीजचा त्रास असल्याचं आढळून आलं.
महिलेमध्ये क्यासानूर फॉरेस्टची सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे काळजी नाही, असं शिवमोग्गा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेश एस उरगीहल्ली यांनी सांगितलंय.
डिसेंबर 2019 ला क्यासानूरमध्ये 22 जणांना आपला जीव गमवावा लागला. शिवमोग्गा येथे गेल्या दोन वर्षांत या आजाराने एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोनामुळे क्यासानूर प्रभाव कमी असल्याची माहिती मिळाल्याने आता आरोग्य विभाग टेन्शनमध्ये असल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी
लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्येच; प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
सलमान खानचं टेन्शन संपेना! शेजाऱ्यानेच केलेत धक्कादायक आरोप
अजित पवारांची मोठी घोषणा! ‘या’ ग्रामपंचायतीला मिळणार 50 लाखांचं बक्षीस
दारू पाजून, जेवू घालून मेहुण्यानं काढला भाऊजीचा काटा, धक्कादायक कारण समोर