देशभर चर्चेत असणाऱ्या ‘The Kashmir Files’वर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | देशभरात सध्या विविध चित्रपटांवरून मोठा वाद उद्भवला आहे. झुंड, पावनखिंड, द काश्मीर फाईल्स (The kashmir Files), गंगुबाई काठियावाडी या सिनेमांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.

द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून देशात दोन गट पडले आहेत. काश्मीरवरून देशात मोठा वाद अगोदरच असताना आता या चित्रपटामुळं वादात आणखीन भर पडली आहे.

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केल्याचं म्हटलं आहे.

1990 च्या दशकात काश्मीरमध्ये घडलेल्या सत्य घटनांवर हा चित्रपट प्रकाश टाकत असल्याचं समिक्षकांचं म्हणणं आहे. परिणामी चित्रपटांना अनेक राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील द काश्मीर फाईल्सवर आपलं मत मांडलं आहे. भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीस मोदी संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं.

सत्य दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं मोदी म्हणाले आहेत. मोदींनी अशाप्रकारचं वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे काॅंग्रेसवर टीका केली आहे.

द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून देशात जोरदार राजकीय जुगलबंदी रंगली आहे. तत्कालीन सरकारनं काश्मीरी पंडीतांवर अन्याय केल्याची टीका भाजपनं केली आहे.

दरम्यान, तत्कालिन व्ही पी सिंह सरकारला भाजपचा पाठिंबा होता परिणामी भाजपच्या सहकार्यानं काश्मीरी पंडीतांवर अन्याय झाल्याची टीका काॅंग्रेसनं केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

 मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

  ‘काॅंग्रेस मूर्खांच्या नंदनवनात रमलीय’; ‘या’ काॅंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर