मुंबई | बॉलिवूड मधील कलाकारांच्या अफेअर्सच्या चर्चा नेहमीच चालू असतात. बरेच कलाकार हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असतात. चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय चाललंय, हे जाणून घेण्याची इच्छा असते.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरीना कैफ या दोघांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. या दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याचं देखील काही दिवसांपूर्वी बोललं जात होतं. मात्र, नंतर विकी कौशलच्या वडिलांनी ही केवळ अफवा असल्याचं सांगितलं.
अशातच आता कतरीना आणि विकी लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. ते दोघे या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये लग्न करतील, असं बोललं जात आहे. तसेच या दोघांनी आपल्या लग्नाच्या तयारीला सुरुवात देखील केली आहे.
हे दोघे राजस्थान मधील उदयपूरमध्ये लग्न करतील, असं बोललं जात आहे. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि मोजकेच लोक उपस्थित राहतील, असं देखील बोललं जात आहे. मात्र, अद्याप कतरीना किंवा विकीने या बातमीला दुजोरा दिला नाही.
कतरीना आणि विकीच्या लग्नाची बातमी समोर येताच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. या दोघांचे चाहते ही बातमी ऐकून खूप खूष झाले आहेत. आता ही बातमी खरी आहे की नाही, ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
काही दिवसांपूर्वी जेव्हा दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर आली होती. तेव्हा या बातमीमुळे बरेच वादविवाद झाले होते, अशी देखील माहिती समोर आली होती. साखरपुड्याच्या बातमीमुळे हे दोघेही नाराज होते.
दरम्यान, विकी कौशलला अनेकवेळा कतरीनाच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघे शेरशाह चित्रपटाच्या प्रदर्शनाला पोहोचले होते. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
सिद्धार्थ आणि शहनाजने गुपचूप उरकला होता साखरपुडा, डिसेंबरमध्ये करणार होते लग्न?
सिद्धार्थ आणि शहनाजच्या नात्याविषयी राहुलने केला मोठा खुलासा म्हणाला, ते दोघे…
ऐकावं ते नवलंच! चक्क पक्षी रडतोय लहान बाळासारखा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत
बॉयफ्रेंडसोबत स्टंट करणं तरूणीला पडलं महागात, पाहा व्हिडीओ
डान्स करायच्या नादात चक्क टीव्हीच घेतला अंगावर, पाहा चिमुकलीचा मजेशीर व्हिडीओ