केदार जाधव, मुक्ता बर्वे, धर्मकिर्ती सुमंत यांना पुणे विद्यापीठाचा ‘युवा गौरव पुरस्कार’

पुणे | सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे या वर्षापासून ‘युवा गौरव पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली आहे. या पहिल्याच पुरस्काराचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू केदार जाधव, मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि प्रसिद्ध युवा नाटककार धर्मकिर्ती सुमंत हे मानकरी ठरले आहेत.

कला, क्रिडा, साहित्य, संशोधन आणि सामाजिक या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणाऱ्या आणि 40 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. या वर्षीच्या, पहिल्याच पुरस्कारासाठी या तिघांची निवड करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. मानपत्र व 25 हजार रुपये असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. एका वर्षी जास्तीत जास्त 4 जणांना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो.

विद्यापीठाच्या या तिन्ही माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेणे आमचे कर्तव्यच होते. त्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु प्रा. नितीन करमळकर यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी सरकार देवेंद्र फडणवीसांचा केंद्रीय मंत्रिमंडळात उपयोग करून घेणार?

-“भारत माझा देश आहे, पण तो पाकिस्तानी आणि बांगलादेश घुसखोरांचा नाही”

-रजनीकांत भाजपचे पोपट आहेत- पी.चिदंबरम

-भाजप हा फेकू लोकांचा पक्ष आहे; ममता बॅनर्जींची भाजपवर सडकून टीका

-370 कलम रद्द करणं हा मोदींचा घातक निर्णय- इमरान खान