“सैन्य तयार ठेवा, 2024 मध्ये आपल्याला जिंकायचंय”

मुंबई । आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्ष आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. दररोज वेगवेगळ्या घोषणा देखील केल्या जात आहे. सत्ताधारी आणि विरोधा पक्ष यांचे आरोप प्रत्यारोपांचे सत्र चालुच आहे.

त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आगामी निवडणुकांसाठी आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्यास सांगितलं आहे.

जयंत पाटील म्हणाले की, आगामी 2024 च्या निवडणुकांसाठी आपल्याला तयार रहायला हवं, त्यासाठी आपले सैन्या तयार असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणच्या बुथवर आपण लक्ष द्यायला पाहिजे.

सर्व ठिकाणी राष्ट्रवादी प्लसमध्ये असायला हवी, जर आपण एखाद्या ठिकाणी मायनस जात असेल तर तेथे आपण मायनस का जातोय याचा अभ्यास करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी आत्ताच कामाला लागायला पाहिजे, असंही ते म्हणाले.

आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची परिवार यात्रा सांगोला येथे पार पडली. यावेळी त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाची पाहणी केली.

त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे अशा अनेक दिग्गजांनी आपली मते माडली.

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी नेहमीच आपल्या लोकांसाठी काम केलं आणि करत सुध्दा आहेत.

सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दिपक आबांनी कायम ठेवली असून या मतदारसंघात आपल्याला चांगली प्रगती करायची आहे. सांगोल्यातील आपला पक्ष कशा पध्दतीने कार्यकरत आहे. याची पाहणी या सवांद यात्रेत घेतली आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

सांगोल्यात राष्ट्रवादीला अनेक वर्ष पाठिंबा देणारे गणपतराव देशमुख यांनी केलेल्या कामांची स्तुती करत मंत्री जयंत पाटील म्हणाले की, या पुढंही या मतदारसंघात अधिक काम करण्याची गरज आहे. असं आवाहान संवाद यात्रेदरम्यान जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

खुशखबर! यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार, सरासरीच्या 104 टक्के पाऊस होणार!

कोरोनाच्या चौथ्या लाटेवर राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

EPFO कडून खातेधारकांना अलर्ट जारी, तुम्हीही ‘या’ चुका करू नका

“…त्यामुळे भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही”, अमित शहांनी सांगितलं कारण

बिल गेट्स यांनी दिला जगाला धोक्याचा इशारा, म्हणाले “कोरोनानंतर आता…”