कोरोनाविरोधी लढ्यात केरळची महाराष्ट्राला मोलाची मदत, मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई | महाराष्ट्राचा कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतो आहे. मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर-औरंगाबादसह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या आता 70 हजार पार गेली आहे. अशातच मुख्ममंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळ सरकारकडे मदतीची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन केरळ सरकारने महाराष्ट्राला मोलाची मदत केली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या विनंतीनंतर केरळ शासनाने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५० जणांची पहिली टीम मुंबईत पोहोचली आहे.  कोरोनाविरोधातील लढ्यात आता महाराष्ट्रातील डॉक्टरांना केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होईल. केरळच्या डॉक्टर व परिचारिकांचे पहिले पथक सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांनी दिली आहे. केरळच्या मोलाच्या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आभार मानले.

कोरोनाशी यशस्वी लढा दिलेल्या केरळमधील डॉक्टर आणि नर्सेसना राज्यात पाठविण्याची विनंती राज्य सरकारतर्फे पाठविलेल्या पत्रात केरळ सरकारकडे करण्यात आली होती. केरळमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात सरकार आणि यंत्रणेला आलेल्या यशानंतर आता तोच प्रयोग महाराष्ट्रातही व्हावा, अशा सरकारचा मानस आहे.

केरळच्या नर्सेस आणि डॉक्टर्सने प्राणपणाने लढत केरळला कोरोनापासून अगदी काही दिवसांत वाचवलं. त्यांचा हाच अनुभव महाराष्ट्र राज्याच्या देखील कामी यावा, असा मानस ठेऊन राज्य सरकारने केरळ शासनाला पत्र लिहिलं होतं. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्याशी व्ही.सी. द्वारे चर्चा केली होती. यावेळी कोरोनाशी लढताना केरळने कोणत्या उपाययोजना केल्या?, टाळेबंदीसंबंधी नियम आणि अटी काय होत्या?, केरळची क्वारंन्टाईन प्रोसेस काय होती, यासह आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या संकटकाळात 30 हजार दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल

-कोरोनाच्या संकटकाळात 30 हजार दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल

धारावीत अवघ्या 15 दिवसांत कोविड रूग्णालय बांधून तयार, आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी

-मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिलीये पण….- संजय राऊत

-‘निसर्ग’ चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज, मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘प्लॅन’!