आधि गळा दाबून मारल, नंतर केला अत्याचार मुंबईत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

मुंबई- नालासोपारा मध्ये झालेल्या त्या महीलेच्या हत्येचं गुढ अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उकललं आहे. त्या महीलेला मारुण नंतर तिच्यावर अत्याच्यार केला असल्याची धक्कादायक माहीती पोलिसांनी दिली. संशयीत दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

नालासोपारा पुर्व चंदन नाका येथे नगीना आशिष यादव या 27 जूनला बेपत्ता झाल्याची तक्रार नगीनाच्या पतीने तुळींज पोलिसठाण्यात केली होती. दरम्यान पोलिस तपासामध्ये मयत नगीना यादव ह्या 26 जूनला काही सामान आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या त्या प्रेम नॉव्हेल्टी स्टेशनरी कॉस्मेटीक गिफ्टच्या दुकानात गेल्या असता त्यांचा व त्या दुकाणदार शिवा नागाराम चौधरी याचा काही वाद झाला आणि त्या वादातूनच त्याने नगीनाला दुकाणामध्ये नेवुन तिचा गळा दाबुन हत्या केली व तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने समोर आणली आहे.

तसेच नगीनाचा मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळून रात्रीचा खांद्यावर घेवून चंदन नाका इथल्या एका बंद असलेल्या महिंद्रा पिकप टेम्पो मध्ये टाकण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह स्थानिकांच्या लक्षात आला आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.

या प्रकरण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. तर पालघर पोलीस अधीक्षक, दत्तात्रेय शिंदे, वसई अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, नालासोपारा पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शना खाली हा तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

-योगी सरकारच्या उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलिसांचा मृत्यू

-…तर माझ्याजवळ आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही- अभिनेत्री राणी चॅटर्जी

-…म्हणून बापानेच आवळला पोटच्या पोरीचा गळा