मुंबई |आज सकाळीच किरीट सोमय्या यांच्या घराखाली 40 ते 50 गाड्यांची रांग लागली होती. यावेळी शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली.
सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या घोषणा दिल्या. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता.
मंत्री अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या अधिकच आक्रमक झाले आहेत. हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत.
विधानसभेत भाषणात काल मुख्यमंत्री मला अटक कराघोटाळेबाज सरकारचा हातात हातोडा घेऊन सत्यानाश करणार आहे, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.
आम्ही जनतेचा हातोडा आहे. बारा कोटी जनतेचा हातोडा आहे. हा आमचा सत्याग्रह आहे. तसेच अनिल परबला आज ना उद्या मंत्रीमंडळातून बाहेर काढावं लागणार आहे, असंही ते म्हणालेत.
माझ्या मागे जनता आहे, मोदी सरकारची झेट कॅटेगिरी सुरक्षा आहे. मी माफियागिरी दाऊदगिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये वाद, संजू सॅमसन भडकला
“एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात”
The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”