“संप मागे घ्या, कोणाचीही नोकरी जाणार नाही”

मुंबई | एसटी कामगारांच्या मागण्यांवर सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये अद्यापी तोडगा निघाला नाही. परिणामी राज्यात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्यात गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कामगारांचा संप चालू आहे. काही ठिकाणी एसटी कर्मचारी कामावर परतल्यानं एसटी सुरू करण्यात आलेली आहे.

अद्यापी पुर्ण क्षमतेनं एसटी वाहतूक होताना दिसत नाही. परिणामी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांवर आमचा कसलाही राग नाही किंवा आकस देखील नाही, असं वक्तव्य परब यांनी केलं आहे. परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे.

एसटी कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात गैरसमज पसरवले जात आहेत, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

31 मार्च 2022 पर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं. कोणावरही कारवाई केली जाणार नाही. कोणाचीही नोकरी जाणार नाही, असं अनिल परब म्हणाले आहेत.

राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेनंतर काही मागण्यांवर समन्वय  झाला होता. पण एसटीच्या विलिनीकरणावर तोडगा निघत नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “जन्मल्यापासून आजपर्यंत मी दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही”

 पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल ‘इतका’ पगार

 The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”