मुंबई | श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात एक नाव समोर आलं होतं आणि ते म्हणजे पुष्पक ग्रुपचं. हा पुष्पक ग्रुप महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि कुटुंबीयांच्या मालकीचा आहे. यापैकीच एक असलेल्या चंद्रकांत पटेल यांच्यासोबतचा उद्धव ठाकरेंचा एक फोटो भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केला आहे.
श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात चंद्रकांत पटेल यांचं नाव समोर आलं होतं. आता याच चंद्रकांत पटेल यांच्या सोबतचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो किरीट सोमय्यांनी ट्विट केला आहे.
हा फोटो कधीचा आहे हे माहिती नाहीये आणि याची सत्यता आम्ही पडताळलेली नाहीये. मात्र, श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात ज्या चंद्रकांत पटेल यांचं नाव समोर आलं होतं. त्या चंद्रकांत पटेल आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो किरीट सोमय्यांनी ट्विट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये.
किरीट सोमय्यांनी दावा केला आहे की, चंद्रकांत पटेल आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत. चंद्रकांत पटेल हे सीए असल्याचं सांगितलं जात आहे.
काही राजकीय नेत्यांचे आर्थिक व्यवहारही ते सांभाळत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पटेल एकत्र असल्याचा फोटो किरीट सोमय्या यांनी ट्विट केला आहे.
किरीट सोमय्या यांनी केलेल्या या ट्विटवर अद्याप मुख्यमंत्री कार्यालय किंवा शिवसेनेकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र, किरीट सोमय्या यांनी केलेले हे आरोप अत्यंत गंभीर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन”
“होय, आम्ही गांधी-नेहरू घराण्याचे गुलाम आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहू”
“एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते रोज आमच्यावर मिसाईल सोडताहेत”
Corona Virus | कोरोनाच्या नव्या Omicron BA-2 व्हेरिएंटचं पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा