‘आता ठाकरे सरकारची दादागिरी संपली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’; भाजपचा आक्रमक पवित्रा

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या प्रकरणाचा तपास साीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपने याआधीही सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआय द्यावा, अशी मागणी केली होती. आता न्यायालयानेहा हा निर्णय घेतल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आता ठाकरे सरकारची दादागिरी संपली, अशा शब्दात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत एक व्हिडीओही शेअर केला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकरात राजीनामा दयायल हवा. मुंबई पोलीस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर दाखल करून न घेणं हे दुर्देवी आहे. ठाकरे सरकार  काहीतरी बोध घेईल अशी आशा असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतचा तपास सीबीआयकडे सोपवत मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे द्यावेत, असे आदेश दिले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

“सलमान खान आणि करण जोहर या दोघांनी सुशांतला सिनेमे मिळू दिले नाहीत”

सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यावर अंकिता लोखंडे म्हणाली…

महेश भट यांचं रियासोबतचं ‘ते’ दृश्य पाहून नेटकरी संतापले; पाहा व्हिडीओ

राऊतांनीच सुशांतची केस सीबीआयकडे जाण्यासाठीचं काम सोप्प केलं आता तेच तोंडावर पडलेत- नारायण राणे

मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे एक षडयंत्र- संजय राऊत