मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना नेते यशवंत जाधवांवर आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. यशवंत जाधव यांनी मुंबईत 36 हून अधिक जुन्या इमारती विकत घेतल्या आहेत. त्यात एक हजाराहून अधिक गाळे घरं आहे, असा दावा सोमय्यांनी केलाय.

ईडी, आयकर विभाग आणि कंपनी मंत्रालयाने याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर येत्या काही दिवसात कारवाई होणार हा विश्वास आहे. यशवंत जाधवांकडे एवढी संपत्ती आहे तर त्यांच्या नेत्यांकडे किती?, असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आधी ट्विट करून आणि नंतर मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. यशवंत जाधव यांनी गेल्या दोन वर्षात 36 मालमत्ता खरेदी केल्या आहेत.

जुन्या इमारती पगडीच्या आहेत. रोख पेमेंट देऊन त्या घेतल्या आहेत. हा एक हजाराहून अधिक कोटीचा घोटाळा बाहेर आला आहे, असा खळबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

2020 मध्ये 7 आणि 2021मध्ये 24 मालमत्ता त्यांनी खरेदी केल्याचं आयकर विभागाच्या धाडीतून उघड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. माझगाव येथील बिलखांडी चेंबर येथेही त्यांनी काही घरे विकत घेतली आहेत.

जुनी घरे कमी किंमतीत त्यांनी विकत घेतली आहेत. तसेच गाळे आणि जुन्या इमारतीतील खोल्याही त्यांनी विकत घेतल्याचा भाजपचा आरोप आहे.

दरम्यान, शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाची धाड पडली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

लोकमान्यता असलेले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी! 

Russia Ukraine War | रशिया सैन्यासंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

‘द काश्मीर फाईल्स’ वरून प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले… 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेणार

“ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस बरोबर सत्तेत बसली त्याच दिवशी हिंदुत्वाला लाथ मारली”