लोकमान्यता असलेले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीनं यासंदर्भात सर्व्हे केला होता.

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. खरंच हा अभिमानाचा क्षण आहे, असंही नारायण राणे म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील लोकमान्यता असलेल्या नेत्यांमध्ये तब्बल 77% रेटिंग मिळालं आहे. यामुळे ते पुन्हा एकदा ते सध्याच्या काळातील जगातील सर्वात मोठे नेते ठरलेत, असं नारायण राणे म्हणालेत.

हे रेटिंग जून 2021 मधील 66% टक्क्यांवरून नोव्हेंबर 2021 मध्ये 70 टक्क्यांवर गेलं आणि त्यानंतर आता 77% वर आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

गेल्या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले होते.

सर्वेक्षणात पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 71% होते. अमेरिकन डेटा इंटेलिजेंस फर्म द मॉर्निंग कन्सल्ट प्रत्येक देशातील प्रौढांचे सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार करते.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

Russia Ukraine War | रशिया सैन्यासंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

‘द काश्मीर फाईल्स’ वरून प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले… 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेणार

“ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस बरोबर सत्तेत बसली त्याच दिवशी हिंदुत्वाला लाथ मारली”

‘…तोपर्यंत आई-वडीलांच्या मालमत्तेवर मुलांचा हक्क नाही’; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय