“प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणं हा…”

मुंबई |  देशाला 1947मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, असं खळबळजन वक्तव्य अभिनेत्री कंगणा रणावतने केलं आहे. कंगणाच्या या वक्तव्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

कंगणावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगणा राणावतचा जोरदार समाचार घेतला आहे. त्या मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

कंगना दर तीन महिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात यायला बघते. ती जन्मली कुठे, रोजीरोटी कमवायला येथे कुठे आणि येथे येऊन माझ्या मुंबईची आणि महाराष्ट्राची पाकिस्तानशी बरोबरी काय करते, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी कंगणाला सुनावलं आहे.

आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं ते एका समाजाचे नव्हते. सर्व जाती-धर्माचे होते. कंगनाचे बेताल वक्तव्य म्हणजे या साऱ्या आहुती दिलेल्या लोकांचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.

आपल्या देशात अनेक लोक आहेत. ते अतिशय चांगलं काम करतात. मात्र, हिच्यात काय टॅलेंट बघून पद्मश्री पुरस्कार दिला, हे मला समजत नाही. अशा नटीला पद्मश्री देणे हा अखंड हिंदुस्तानचा अपमान आहे, असंही त्या म्हणाल्यात.

कंगनाचा राजकीय, अराजकीय, सामाजिक सर्व स्तरातून निषेध होत आहे. माझी गृह राज्य विभागाला हात जोडून विनंती आहे की, त्यांनी अशा बेताल मुलीवर लक्ष द्यावं. जी संपूर्ण संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान करते, असं त्या म्हणाल्यात.

सर्व लोकांमध्ये कंगणा फूट पाडते. ती नको त्या विषयात उगीच ढवळाढवळ करत असेल आणि आमच्या हुतात्म्यांचा अपमान करत असेल तर तिचा निषेध आपल्याया न्यायिक बाजूनं करावा लागेल. तिच्यावर कारवाई करून विषय संपवून टाकावा, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

दरम्यान, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण करावं असा प्रस्ताव आहे. त्याच्यावर आणि त्यामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्यावर आम्ही नक्कीच सकारात्मक विचार करू, असं आश्वासनही पेडणेकर यांनी यावेळी बोलताना दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 ‘ज्येष्ठता आणि शहाणपणा….’; अतुल कुलकर्णींचा विक्रम गोखलेंना टोला

“धमकी देऊन न्याय मिळत नाही, न्यायालयात आपली बाजू मांडा” 

सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं, घाऊक बाजारात महागाईचा कहर

‘तुटेल एवढं ताणू नये’; शरद पवारांचा राज्य सरकारला सूचक सल्ला

  ‘…म्हणून राज्यात इंधन दर कमी होणार नाही’; अजित पवारांनी सांगितलं कारण