‘काय लावायचं ते लावून टाका पण…’; भर कार्यक्रमात अजित पवार भडकले

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कामात जर कोणत्याही प्रकराचं गैरप्रकार होत असतील तर त्यावर अजित पवार थेट कारवाई करताना दिसून येतात.

एखाद्या कामाला अचानक भेट देण्याची अजित पवारांची पद्धत आहे. त्यामुळे काम नक्की कसं चाललंय, याची योग्य माहिती मिळते, असं अजित पवार म्हणतात. तर कुचकामी करणाऱ्याची सर्वांसमोर अजित पवार कानउघडणी देखील करतात.

बारामतीतील एका तालुक्यात अवैध दारूविक्री होत होती. या अवैधरित्या होणाऱ्या दारूविक्रीमुळे अनेक महिला त्रस्त आहेत. अशातच एका महिलेने थेट अजित पवारांना एक निवेदन दिलं.

आपला नवरा दररोज दारू पिऊन घरी येतो, मारहान करतो आणि त्रास देतो, असं या महिलेेने निवेदनात म्हटलं होतं. त्यामुळे बारामतीतील अवैध दारूविक्री बंद करावी, अशी मागणी या महिलेेने केली आहे.

त्यानंतर भर सभेत अजित पवारांनी हे निवेदन हातात घेतलं आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. डीवायएसपी साहेब दारूबंदी करावी, अशा मागणीचं निवेदन मला आलंय. 2007 मध्ये आपल्याकडे दारूबंदी झाली होती, असं अजित पवार डीवायएसपीसमोर म्हणाले.

2007 मध्ये आपल्याकडे दारूबंदी झाली, आता ती पुन्हा सुरू झाली आहे. या गोष्टीचा त्रास सध्या सर्व गोरगरिब महिलांना होताना दिसतोय, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

सर्वांना त्रास होतोय, मग नेमका प्राॅब्लेम काय आहे? आता तुम्ही कायमची दारू बंदी करून टाका, काय लावायचंय ते लावा पण दारू बंदी करून टाका, असं अजित पवारांनी अधिकाऱ्यांना यावेळी खडसावलं आहे.

जे काही असतील ते टाडा लावा, तुम्ही चांगले डीवायएसपी म्हणून मी तुम्हाला बारामतीत आणलं होतं, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

बारामतीतील कोणत्याही भागात चालू असलेले दोन नंबरचे धंदे आधी बंद करा. हातभट्ट्या आधी बंद करा असंही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, भर कार्यक्रमात अजित पवारांनी थेट अॅक्शन घेण्याचे आदेश दिल्याने बारामतीत अजित पवार चर्चेचा विषय ठरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“धमकी देऊन न्याय मिळत नाही, न्यायालयात आपली बाजू मांडा”

सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं, घाऊक बाजारात महागाईचा कहर

‘तुटेल एवढं ताणू नये’; शरद पवारांचा राज्य सरकारला सूचक सल्ला

  ‘…म्हणून राज्यात इंधन दर कमी होणार नाही’; अजित पवारांनी सांगितलं कारण

  ‘पुन्हा गुजरात कनेक्शन’; नवाब मलिकांच्या नव्या ट्विटनं खळबळ