11 वर्षाच्या वरदला केएल राहुलने दिला मदतीचा हात; उपचारासाठी 31 लाखांची मदत

मुंबई |  भारतीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीचा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या केएल राहुलचा मनाचा मोठेपणा जगानं पाहिला आहे. लोकेश राहुल हा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

दुर्मिळ रक्त विकाराशी संघर्ष करणाऱ्या 11 वर्षीय मुलाला अस्थिमज्जा प्रत्यारोपासाठी तातडीने आर्थिक मदतीची गरज होती. त्यावेळी राहुलने मुलाच्या उपचारासाठी मदत करत सर्वांची मनं जिंकली आहेत.

11 वर्षीय वरद नलावडेला बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी गरज असलेली 35 पैकी 31 लाख राहुलने दिले.  पाचव्या इयत्तेत शिकणारा वरद सप्टेंबरपासून मुंबईतील जस्लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तेथे त्याला aplastic anaemia या दुर्मिळ रक्त विकार झाल्याचं निदान झालं.

वरदच्या रक्तपेशी खूपच कमी झाल्या आणि रोगप्रतिकार प्रणालीत इन्फेक्शन झालं. त्यामुळे त्याचा तापही बरा होण्यास महिना लागत होता. त्यामुळे अस्थिमज्जा प्रत्यारोपण हा एकच उपाय उरला होता.

वरदचे वडिल सचिन नलावडे हे इश्युरन्स एजंट आहेत आणि आई स्वप्ना या गृहिणी आहेत. वडिलांनी वरदसाठी PF मध्ये बचत केलेली रक्कमही काढली आहे. वरदला मोठं होऊन क्रिकेटपटू बनायचे आहे.

वरदबद्दल जेव्हा मला समजले तेव्हा माझ्या टीमनं Givelndia शी संपर्क साधला. वरदवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली, हे जाणुन मला आनंद झाल्याचं राहुलने सांगितलं आहे.

आता त्याची प्रकृती चांगली आहे. लवकरच त्याने स्वत:च्या पायावर उभा राहून स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करावी ही माझी इच्छा आहे, असं लोकेश राहुल म्हणाला.

दरम्यान, वरदच्या आई स्वप्ना यांनी लोकेश राहुलचे आभार मानले आहेत. त्यामुळे आता राहुलचा दिलदारपणा आता सर्वांनाच भावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…

थेंबे थेंबे तळे साचे! पोतंभर चिल्लर देऊन अखेर पठ्ठ्यानं स्कुटी घेतलीच; पाहा व्हिडीओ

नंबर 1 यारी! खचलेल्या लाडक्या चिकूसाठी युवराजने लिहिलं पत्र, म्हणाला…