नव्या बदलासह नवी ‘Maruti Suzuki Baleno’ लवकरच भारतीय बाजारात धडकणार!

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. भारतीय वाहन बाजार हा जगातील प्रमुख वाहन बाजार आहे. या बाजाराला देखील कोरोना काळाचा प्रचंड फटका बसला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होत आहे तसंतसं भारतीय वाहन बाजारात तेजी पहायला मिळत आहे. अशातच आता मारूती कंपनी आपल्या खास फिचरच्या नवीन माॅडेलला लाॅन्च करणार आहे.

मारूती कंपनीची प्रसिद्ध गाडी बलेनो ही लवकरच आपल्या नव्या स्वरूपात ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या माॅडेलमध्ये अधिक आकर्षक पद्धतीनं अनेक बदल करण्यात आले आहेत.

बलेनो ही माॅडेल भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे. या गाडीनं आपल्या पहिल्या माॅडेलची विक्रमी विक्री नोंदवली होती. परिणामी आता ग्राहक नव्या स्वरूपात येत असलेल्या बलेनोची प्रतिक्षा करत आहेत.

23 फेब्रुवारीला नवीन स्वरूपात बलेनो ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्या गाडीमध्ये बलेनोचा समावेश होते. परिणामी ग्राहक या गाडीची वाट पाहत आहेत.

बलेनोची पहिली माॅडेल भारतात 2015 साली लाॅन्च करण्यात आली होती. तेव्हापासून बलेनो भारतीय बाजारात अग्रगण्य गाडी आहे. एलईडी लाइट्स या अद्यावत यंत्रणेसह ही गाडी लाॅन्च होतीये.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बलेनो गाडीच्या तुलनेत नवीन व्हेरियंट हे वेगळं असणार आहे. यामध्ये ग्राहकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यावर कंपनीनं भर दिला आहे.

दरम्यान, मारूती सुझुकी बलेनोची किंमत ही 6.50 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत आहे. या गाडीत सर्व अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. 360 डिग्री कॅमेरा हा वैशिष्ट्येपूर्ण असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…

थेंबे थेंबे तळे साचे! पोतंभर चिल्लर देऊन अखेर पठ्ठ्यानं स्कुटी घेतलीच; पाहा व्हिडीओ

नंबर 1 यारी! खचलेल्या लाडक्या चिकूसाठी युवराजने लिहिलं पत्र, म्हणाला…

Corona: महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…