रेल्वे स्टेशनवर प्लास्टिक कपाऐवजी मातीच्या पेल्यातून चहा प्या- नितीन गडकरी

मुंबई | कुल्लडमधून म्हणजेच मातीच्या पेल्यामधून चहा उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यामुळे मातीकाम करणाऱ्या कुंभारांना रोजगार मिळेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत विविध ठिकाणी चहासाठी प्लॅस्टिक किंवा कागदाच्या कपांचा उपयोग केला जातो. त्यामुळे होणारं प्रदुषण आणि बाकीच्याही बाबी लक्षात घेऊन गडकरींनी कुल्लड चहाला प्रोत्साहन दिली असल्याची चर्चा आहे.

गडकरींनी रेल्वे मंत्री आणि सर्व राज्यांच्या वाहतूक सचिवांना प्लास्टिक आणि कागदी कपाऐवजी मातीचे भांडे (कुल्लड) देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मागील काही काळापासून कुल्लड चहाच्या मागणीतही वाढ होत आहे. चहाप्रेमी कुल्लडमधून चहा घेणं पसंत करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-