कामगारांनो…सरकारला फक्त ‘ही’ 3 कागदपत्रं द्या अन मिळवा 6000 रूपये

नवी दिल्ली | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही मिळणार आहे. बॅक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रांची पुर्तता करून कामगारांना आता 6000 रूपयांचा लाभ मिळणार आहे.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. कामगार वरील अटी पूर्ण करत असतील तर त्यांची नोंदणी करून घेण्यात यावी. यानंतर सरकारकडून तुमच्या खात्यावर पैसे जमा केले जातील, असं चौधरी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

या योजनेचा फाॅर्म ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट वर भरावा लागणार आहे. संबंधीत खात्याकडून सर्व अर्जांची पडताळणी करून संबंधीत कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कोरोनाच्या वातावरणात अनेक परप्रांतीय मजुरांनी स्थलांतर केलं. याकाळात हातावर पोट असलेल्या हजारो कामगारांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या. या कामगारांची आर्थिक चणचण थांबावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं आता बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनिल औषध वादाच्या भोवऱ्यात; रामदेव बाबा यांच्यासह या 5 जणांवर गुन्हा दाखल

-‘अरे गोपीचंदा… लायकी पाहून बोलावं’; अजित पवारांचं पडळकरांना उत्तर

-कोरोनावर इंजेक्शन निघालंय पण…; पाहा शरद पवार काय म्हणाले

-इतिहासात अशी इंधन दरवाढ मी पाहिली नाही- शरद पवार

-काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा