‘तेरे दर पर सनम चले आये’; लालूंचा नितीश कुमारांना फिल्मी स्टाईल टोला

पाटणा | राष्ट्रीय जनता दल पक्षाचे लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर फिल्मी स्टाईलने टीका केली आहे. एकीकडे संघावर टीका करत असताना दुसरीकडे भाजपशी हात मिळवणी करण्यावरून लालू यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपचे संस्थापक सदस्य असणाऱ्या दीन दयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाटण्यामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. याच कार्यक्रमाचे फोटो लालू प्रसाद यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. तसेच या फोटाला ‘तेरे दर पर सनम चले आये…तू ना आया तो हम चले आये’ या गाण्याच्या ओळी कॅप्शन म्हणून देण्यात आल्या आहेत.

उपाध्याय यांच्या पुतळ्यासमोर हात जोडून उभ्या असणाऱ्या नितीश यांचा फोटो आणि कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका ट्विट केली आहे.

दरम्यान, तसेच या गाण्यामध्ये बदल करत लेके संघमुक्त भारत का भरम चले आये…ले के अपना भरम स्वयं चले आये, असा टोला लगावण्यात आला आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

-…म्हणून राज्य निवडणूक आयोगाने बजावली राज ठाकरेंना नोटीस

-वडील चालवतात पंक्चरचं दुकान; अन् लेक झाला सलग दोन वेळा दिल्लीचा आमदार

-श्रद्धा आणि टायगर हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला ; पाहा व्हिडीओ

-कमलनाथ, तमाम शिवभक्तांची माफी मागा- उदयनराजे भोसले

-उद्धवजी, हिंमत असेल तर एकट्याने विधानसभा निवडणूक लढवून दाखवा- चंद्रकांत पाटील