जालन्यात रावसाहेब दानवेंना धक्का; जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता

लातूर | सध्या राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं वातावरण आहे. काही ठिकाणी  महाविकास आघाडीची सत्ता आली आहे तर काही ठिकाणी महाविकासआघाडीच्या बंडखोर नेत्यांमुळे भाजपनं सत्ता मिळवली आहे. बीड जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर आता जालना जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपने माघार घेतली आहे.

जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे.

लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल केंद्रे आणि उपाध्यक्षपदी भारतबाई दगडू सोळुंके यांची निवड करण्यात आली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केली आहे. यामुळं त्याचे परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-