सुनेने केलेल्या गंभीर आरोपांवर मौन सोडत महेश भट्ट म्हणाले…

मुंबई | अलीकडे दिग्दर्शक निर्माता महेश भट्ट यांचे नाव चांगलंच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी महेश भट्ट यांच्या सुनेनेच त्यांच्यावर गंभीर आ.रोप केले होते. महेश भट्ट हे चित्रपट इंडस्ट्रीमधील डॉ.न असून त्यांनी अनेकांचे जीवन उध्वस्त केले आहे, असा आ.रोप महेश भट्ट यांचा भाचा सुमित याची पत्नी लविना लोधन केला आहे.

आता त्यावर महेश भट्ट यांच्याकडून प्रत्युत्तर आले आहे. महेश भट्ट यांच्या वकिलांनी निवेदन जारी करून सर्व आ.रोप फेटाळून लावले आहेत. लविना लोधने केलेले सर्व आ.रोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असं महेश भट्ट यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

लविना लोधने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असा आ.रोप केला होता की, सुमित साबरवाल मा.दक पदार्थ विकत घेऊन भट्ट यांना पुरवत असतो. भट्ट बांधवही या व्यवसायामध्ये गुंतले आहेत. लविना लोधने केलेल्या आ.रोपाला उत्तर देताना भट्ट यांनी त्यांचे वकील अमित नाईक यांच्यामार्फत अभिनेत्रीला असे खोटे आ.रोप न करण्याची कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

शुक्रवारी भट्ट बंधूंनी एक निवेदन केले की, ते एक सुप्रसिद्ध व्यक्ती असल्याने त्यांच्यावर खोटे आ.रोप करण्यात येत आहेत. त्यानंतर महेश भट्ट यांनी लविना लोधच्या विरोधात मुंबई हायकोर्टात मानहा.नीचा दावा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश भट्ट यांनी लविनावर 1 कोटी रुपये नुकसान भरपाई आणि खोटे आ.रोप करण्याचा गु.न्हा दाखल केला आहे. यादरम्यान महेश भट्ट यांचा भाचा सुमितने म्हटले आहे की, तो आपली पत्नी लविनापासून विभक्त झाला आहे. लविनाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये केलेले दावे खोटे आहेत. सुमितच्या म्हणण्यानुसार त्याचा महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्याशी काही संबंध नाही.

व्हिडिओमध्ये लविना म्हणाली होती की, माझे लग्न महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवालशी झाले होते. सुमित ड्र.ग्ज आणि मुलींचा पुरवठा करत आहे ही गोष्ट मला समजली व आता मला घटस्फो.ट हवा आहे. महेश भट्ट यांना या सर्व गोष्टी माहित आहेत. ही संपूर्ण सिस्टीम तेच चालवतात.

तुम्ही जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला नाहीत तर ते तुमचे जीवन मुश्कील करतात. त्यांच्या एका फोन कॉलमुळे अनेकांची कामे गेली आहेत. जेव्हापासून मी त्यांच्या विरोधात केस फाईल केली आहे तेव्हापासून त्यांनी मलाही अनेक प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनीही माझी त.क्रार लिहून घेतली नाही, असा आरोप लविनाने केला आहे.

त्यामुळे उद्या जर का मला व माझ्या कुटुंबाला काही झाले तर त्यासाठी महेश भट्ट, मुकेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सहगल आणि कुमकुम सहगल जबाबदार असतील, असंही लविनाने म्हटलं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो सोशल मिडियावर बराच व्हायरल झाला आहे. लोक महेश भट्ट यांच्याबाबत नकारात्मक कमेंट्स करताना दिसत आहेत. मात्र महेश भट्ट यांनी हे सर्व आ.रोप खोटे असल्याचे सांगून याबाबत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगना आणि प्रियंकाने काम केलेल्या ‘फॅशन’ चित्रपटाविषयी निर्मात्याने उलघडलं ‘ते’ गूढ

पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार? संजय राऊतांनी दिला इशारा

आता तर कंगनानं हद्दच पार केली! राष्ट्रपिता महात्मा गांधींवर गंभीर आरोप करत म्हणाली…

काय सांगता! सैफ अली खानला लग्नाआधी करीनाने तब्बल ‘इतक्या’वेळा दिला नकार

अभिनेता आमीर खानला अ.टक होणार का? ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल!